MEDIA COMMUNICATION DAY - 2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एमसीएचआयला आवाहन

April 2026

RBI's Decision to Keep Repo Rate Unchanged: Impact on Thane Real Estate



RBI's Decision to Keep Repo Rate Unchanged: Impact on Thane Real Estate



ठाणे झोपडपट्टी मुक्त करणार,

क्लस्टर प्रकल्पात सहभागी व्हा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे `एमसीएचआय'ला आवाहन

ठाणे, दि. १८ (प्रतिनिधी) : ठाणे शहर झोपडपट्टी मुक्त करण्याचा निर्धार केला असून, शहरातील विविध भागात क्लस्टर योजना परिणामकारक पद्धतीने राबविली जात आहे. `क्लस्टर'बरोबरच शहरातील तळ्यांचे सुशोभिकरण व पुनरुज्जीवन केले जात आहे. ठाणे शहराच्या विकासासाठी क्लस्टर व तळ्यांच्या सुशोभिकरण प्रकल्पात `क्रेडाई-एमसीएचआय'ने सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले.

`क्रेडाई-एमसीएचआय'तर्फे बाळकूम येथील `दोस्ती वेस्ट काऊंटी' येथे २३ वे भव्य प्रॉपर्टी प्रदर्शन सुरू झाले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तातडीच्या कामांमुळे उपस्थित राहता आले नव्हते. मात्र, त्यांनी सायंकाळी प्रदर्शनाला भेट देऊन विकसकांबरोबर मनमोकळा संवाद साधला. तसेच सातत्याने २३ व्या वर्षी प्रदर्शन यशस्वी केल्याबद्दल `एमसीएचआय'च्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. या वेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, नगरसेवक संजय भोईर, क्रेडाई- एमसीएचआय,ठाणे'चे अध्यक्ष सचिन मिराणी, राजूल व्होरा, सचिव फैय्याज विराणी, प्रॉपर्टी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर, खजिनदार जय व्होरा,`क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे'च्या युवा शाखेचे अध्यक्ष निमित मेहता, महेश बोरकर, अमित दातार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

`पुणे तेथे काय उणे', अशी म्हण आहे. पण आता `ठाणे तेथे काय उणे' असे निश्चितपणे म्हणता येईल. ठाणे शहराचा वेगाने विकास होत असून, विविध प्रकल्पांमुळे ठाणे हे आघाडीचे शहर झाले, असे नमूद करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे-बोरिवली टनेल, पाँड टॅक्सी, कोस्टल रोड, ३०० फूट रुंद घोडबंदर रोड आणि मेट्रोमुळे प्रवास वेगात होईल. गायमुख परिसराला भिवंडीतील ग्रामीण भाग जोडण्यासाठी तीन पूल उभारले जाणार आहेत, अशी माहिती दिली. ठाणे शहरात क्लस्टर प्रकल्पाची कामे सुरू असून, त्यात महापालिका, सिडको, एमआयडीसी, एमएसआरडीसी, एमएमआरडीए आणि मुंबई महापालिका सहभागी झाली आहे. शहराच्या विकासासाठी `एमसीएचआय'ने क्लस्टर योजनेत सहभागी व्हावे. शहरात मोठा क्लस्टर प्रकल्प कसा राबविता येईल, याचा विचार करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून २ कोटी कुटुंबांना स्वस्त घरे दिली जाणार आहेत. त्या योजनेच्या यशस्विततेसाठी `एमसीएचआय'ने पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. ठाणे हे तलावांचे शहर असून, `लेक सिटी' ओळख कायम ठेवायची आहे. ठाणे शहरातील सर्व तलावांचे सुशोभिकरण करण्याचे महापालिकेने ठरविले आहे. त्यानुसार जोगिला तलाव हा पुनरुज्जीवीत करण्यात आला. यापुढील काळात आणखी मृत तलावांचे पुनरुज्जीवन केले जाईल. तलावांबरोबरच ठाण्यातील `ग्रीन कव्हर' वाढविण्यासाठीही `एमसीएचआय'ने योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

आपने मांगा था सपना...
हमने आसमा दिया!

`आपने मांगा था सपना...हमने आसमा दिया'असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकसकांना दिलेल्या सवलतींचा उल्लेख केला. देशात कृषी व्यवसायानंतर `रिअल इस्टेट'मधून सर्वाधिक रोजगार मिळतो. कोरोना आपत्ती काळात रिअल इस्टेट व्यवसाय अडचणीत आला होता. त्यावेळी ५० टक्के प्रिमियम, स्टँप ड्युटीसह विविध सवलती देण्यात आल्या. तसेच त्याचा फायदा सामान्य ग्राहकांना देण्याची अटही ठेवण्यात आली, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे' यांच्या वतीने दरवर्षी हजारो नागरिकांच्या गर्दीत होणारे प्रॉपर्टी प्रदर्शन हे एक आव्हान असतं. पण एक ध्येय मानून समर्पित भावनेने झोकून देत दरवर्षी आम्ही सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने प्रदर्शन यशस्वी करतो. या कार्याबद्द्ल उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते सलग दुसऱ्या दिवशी माझा `क्रेडाई-एमसीएचआय'च्या वतीने सन्मान करण्यात आला. माझ्या जीवनात हा क्षण अनमोल ठरला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचीही उपस्थिती होती. मला मिळालेला हा सन्मान मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना समर्पित करतो.

DAY 2
ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधायुक्त इमारत,
मोफत स्टँम्प ड्युटी, जादा कार्पेट एरिया!

`क्रेडाई-एमसीएचआय'च्या प्रदर्शनात ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स, आज प्रदर्शनाचा शेवटचा दिवस

ठाणे, दि. १८ (प्रतिनिधी) :`क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे' यांच्या वतीने बाळकूम येथे सुरू असलेल्या भव्य प्रॉपर्टी प्रदर्शनात घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधायुक्त इमारत, मोफत स्टँम्प ड्युटी, जादा कार्पेट एरिया, संकुलात जादा ऑक्सिजन निर्मितीसाठी वृक्ष लागवड अशी वैशिष्ट्ये विकसकांच्या दालनात सादर करण्यात आली आहेत. त्याला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उद्या रविवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून, नागरिकांना मोफत प्रवेश आहे.

बाळकूम येथील दोस्ती वेस्ट काऊंटी येथे शुक्रवारपासून प्रॉपर्टी प्रदर्शनाला सुरुवात झाली. या प्रदर्शनात ४० हून अधिक विकसकांची दालने आहेत. `क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे'चे अध्यक्ष सचिन मिराणी, सचिव फैय्याज विराणी, प्रॉपर्टी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर यांच्या नेतृत्वात प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आले आहे. ठाणे शहराचा वेगाने विकास होत असताना ठाण्यात दर्जेदार नागरी सुविधा असलेली संकुलांमधील घरे आणि व्यावसायिक कार्यालये प्रदर्शनात उपलब्ध करण्यात आली आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहकांना विविध ऑफर्स देण्यात आल्या आहेत. तसेच वैशिष्ट्यपूर्ण संकुलांना ग्राहकांचा प्रतिसाद लाभत आहे. घर, कार्यालयांबरोबरच दरवाजे, उच्च दर्जाचे बाथरूम साहित्य, बंगले व इमारतींसाठी जनरेटर, आधुनिक जीमची साधने आदींची प्रदर्शनात दालने आहेत. त्याला गेल्या दोन दिवसांत ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

दोस्ती ग्रूपने खास ज्येष्ठ नागरिकांसाठी दोस्ती प्रायमस इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. या इमारतीत ५ फूट रुंद दरवाजा असून, कोपरा न ठेवता वर्तुळाकार शेप दिला आहे. या इमारतीत पॅनिक अलार्म बसविला आहे. ज्येष्ठ नागरिकांना सेवा पुरविणाऱ्या प्रायमस कंपनीकडून ज्येष्ठांना इमारतीत सुविधा पुरविण्यासाठी मेडीकेअर झोन उभारला जाणार असून, २४ तास वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातील. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या आहाराच्या दृष्टीकोनातून कॅफेटोरियातून दररोज अन्न उपलब्ध होईल.

विहंग ग्रूपने भाईंदरपाडा येथे प्रकल्पात ५५ लाख रुपयांत घर उपलब्ध केले असून, कार्पेट क्षेत्र जास्त दिले आहे. त्याचबरोबर अक्षयतृतीयानिमित्त ऑफरचा ग्राहकांना लाभ दिला जाईल. स्क्वेअरफीट ग्रूपतर्फे अवतारा-फॉरेस्ट किंगडम हे प्रशस्त संकुल उभारण्यात आले असून, गृहसंकुलात ऑक्सिजनचे प्रमाण वाढविले जाणार आहे. त्यात बटरफ्लाय टाईपवरील घरेही उपलब्ध असतील. ठाण्यात सर्वाधिक १४४ एकरवर उभारलेले रेमंड गृहसंकुल सर्वात मोठे असून, वृक्षांचे प्रमाण जास्त असल्याचा दावा करण्यात आला. या संकुलात घर घेतल्यास सिंघानिया विद्यालयात मुलांना प्रवेश मिळेल. तसेच ग्राहकांच्या सोयीनुसार घरांची रक्कम घेतली जाणार आहे. दामजी शामजी शहा ग्रूपने येऊरकडे दिशा असलेल्या गृहसंकुलात डेप्थ बाल्कनीची सुविधा दिली आहे.

ठाण्यातील महत्त्वाच्या भागात `बोरकर रियॅलिटी'ने दर्जेदार इमारती उभारल्या आहेत. त्यात ग्राहकांच्या अपेक्षांनुसार दर्जेदार घरे उपलब्ध करण्यात आली आहेत. `ड्रीम ग्रुप ऑफ कंपनी'नेही ठाणे रेल्वे स्टेशनच्या परिसरात पुनर्विकास प्रकल्प उभारले असून, काही प्रकल्पांना आयजीबीसी मान्यता मिळालेली आहे. खारेगाव पारसिकनगरमध्ये प्रथमच श्री कृपा बिल्डरने ५२ मजली इमारत उभारली आहे. या संकुलात घर घेणाऱ्यांना सहा फूट बाल्कनी, फॉल सिलिंग आणि एसी बसवून दिले जातील.

कल्पतरू बिल्डरकडे कोलशेतमधील १०८ एकरमध्ये १ बीएचके पासून ४ बीएचकेपर्यंत रेडी पझेशन घरे उपलब्ध आहेत. ग्राहकांना पहिल्या टप्प्यात १० टक्के रक्कमेसह स्टँम्प ड्युटी माफ केली जाईल. एल अॅण्ड टी रिअॅलिटीनेही घर खरेदी करणाऱ्यांची स्टँम्प ड्युटी माफ केली आहे.

या प्रॉपर्टी प्रदर्शनात बंगल्यांसाठी व गुंतवणुकीसाठी प्लॉट उपलब्ध आहेत. त्याचबरोबर फ्लॅटचे दरवाजे, जनरेटर, दर्जेदार बाथरुम फिटींग, अत्याधुनिक जीमचे साहित्य यांची दालनेही उभारण्यात आली आहेत.

To Know About Thane Real Estate Development Contact Us at (+91) 9833458323


Building image showing the company