MEDIA COMMUNICATION DAY - 3
23rd CREDAI MCHI Thane Property Expo Concludes on a High Note; Registers Record Footfalls and site visit bookings
April 2026
FOR IMMEDIATE RELEASE
23rd CREDAI MCHI Thane Property Expo Concludes on a High Note; Registers
Record Footfalls and site visit bookings
Thane, 19 April 2026: The 23rd edition of the 3-day CREDAI MCHI Thane Property
Expo concluded successfully on 19 April 2026, reinforcing Thane’s position as
MMR’s most dynamic real estate market. Held over three days at Dosti West County,
Thane; the Expo drew 20,467 visitors and facilitated 234 spot bookings across
residential, commercial, and retail segments.
The event showcased 100+ RERA-approved projects from 40+ leading developers,
with inventory ranging from ₹55 lakh 1 BHKs to premium 4 BHK residences.
Strongest traction was seen in the ₹55 lakh to ₹2.25 crore bracket, with Ghodbunder
Road, Kolshet, Pokhran, and Majiwada emerging as top micro-markets. On-spot
loan desks processed 398 loan applications, with banks reporting a 15% higher
sanction rate versus walk-in branches due to Expo-specific facilitation.
Expo-exclusive benefits resulted in many a ‘walk in’ turning into a ‘will buy shortly’
decision, while legal and Vastu guidance counters helped first-time buyers close their
‘dream home’ deal with confidence. Developers also reported significant NRI and
investor interest, citing Thane Metro, Coastal Road, Borivali–Thane Tunnel, and the
upcoming HSR station as catalysts.
Mr. Sachin Mirani, President, CREDAI MCHI Thane, said:
“This was our most successful edition yet. The numbers, both - during the expo and
also over the next few weeks, reflect buyer trust in Thane’s growth story and in
CREDAI MCHI Thane’s curation of credible, RERA-compliant projects. Infrastructure
is no longer a promise, it is visible on ground. That clarity is translating into home
buying.”
Mr. Faiyaz Virani, Hon. Secretary, CREDAI MCHI Thane, added:
“The Expo proved that when you put transparency, choice, and financing together,
decisions happen faster. We thank Thane’s homebuyers, our developer members,
and banking partners for making this a benchmark event. We’re already working on
scaling the next edition.”
Vibhav Borkar, Expo Committee Chairman, CREDAI MCHI Thane confirmed that
follow-up visits and post-Expo loan disbursal will reflect the transactions that the
Expo created. “CREDAI MCHI Thane will support home buyers through to the final
booking and disbursement process, post the Expo,” he added.
About CREDAI MCHI Thane:
CREDAI MCHI Thane is the apex body of real estate developers in Thane,
committed to transparent, sustainable, and buyer-centric urban growth. The annual
Property Expo is its flagship platform connecting home seekers with credible
developers.
Sachin Mirani added that the Expo’s success was also thanks to blessings and good
wishes of Deputy CM Maharashtra Shri Eknath Shinde, Transport Minister
Maharashtra Pratap Sarnaik and elected representatives including MPs, MLAs, MLC
and Corporators of the TMC.
“On the inauguration day, Dr. Shrikrishna Panchal (I.A.S.), District Collector of Thane
and Shri. Saurabh Rao (I.A.S.), Municipal Commissioner of the Thane Municipal
Corporation were among the dignitaries that visited the CREDAI MCHI Thane
Property Expo and toured key project stalls, interacting with developers and
homebuyers.”
Faiyaz Virani added that the dignitaries lauded the Expo’s role in promoting
transparent, RERA-compliant housing and boosting organized growth in Thane. “All
esteemed dignitaries extended their best wishes to CREDAI MCHI Thane for a
successful Expo.”
Vibhav Borkar added that the esteemed dignitaries noted that Thane’s rapid
infrastructure upgrades and proactive civic planning are positioning the city as a
model for sustainable urban development in MMR.
“The expo also featured informative seminars, workshops, and panel discussions on
topics including new trends in housing, sustainable development, and the future of
real estate in Thane,” added Vibhav Borkar.
Summing up, Sachin Mirani pointed out that Thane accounts for a high quantum of
housing launches and sales across the MMR, which underscores the importance of
Thane’s real estate; and how it enables home seekers to get their dream homes in
the city of their dreams – Thane. “A culturally rich city which is safe and secure,
which offers a lifestyle which reflects in homes that meet all requirements of a family
– Thane is arguably, the best option for a home seeking family to make their dream
home come true. Among the best urban conglomerations within not just the MMR,
but across the Nation: Thane,” he concluded.
Media Contact:
Sumit Gudka
MARATHI PRESS NOTE
`क्रेडाई-एमसीएचआय'च्या प्रदर्शनात
अमृता राव यांचे जलअभियान सुरू
ठाण्यातील भव्य प्रॉपर्टी प्रदर्शनात झाला शुभारंभ
ठाणे, दि. १९ (प्रतिनिधी) : `क्रेडाई-एमसीएचआय'च्या प्रदर्शनाच्या निमित्ताने ठाणे शहरात पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी अभिनेत्री अमृता राव यांनी सुरू केलेल्या `जलहित में जारी' अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला. ठाणे महापालिकेबरोबर समन्वयाने अभियान राबविले जाणार असून, त्यासाठी `क्रेडाई एमसीएचआय'ने पुढाकार घ्यावा, असे आवाहन अमृता राव यांनी केले.
`क्रेडाई-एमसीएचआय'च्या प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी आयोजित परिसंवादात अभिनेत्री अमृता राव यांची मुलाखत समाजसेवक आदित्य चौहान यांनी घेतली. त्यावेळी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी आमदार संजय केळकर यांचीही उपस्थिती होती.
ठाणे शहरात रिअल इस्टेटचा वेगाने विकास होत आहे. आपणही ठाण्यातील रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे, असे नमूद करीत ठाणे शहराच्या विकासासाठी महत्वपूर्ण भूमिका बजाविल्याबद्दल `क्रेडाई-एमसीएचआय'चे अध्यक्ष सचिन मिराणी यांचे अभिनंदन केले. यापुढील काळात पाणीबचत गरजेची आहे. त्यामुळे विकसकांनी नव्या प्रकल्पांबरोबरच जुन्या सोसायट्यांनीही पाणीबचतीसाठी पुढाकार घ्यावा.
सर्वप्रथम प्रत्येक नवीन घरात प्रत्येक नळाला शॉवर असलेले टॅप बसवावेत.तसेच जुन्या सोसायट्यांनीही सोसायटीच्या मेंटेनन्समधून शॉवर बसविल्यास पाणीबचत होऊ शकेल. नव्या गृहसंकुलांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारल्यास टंचाईच्या काळात पावसाचे पाणी घरगुती वापरासाठी उपलब्ध होईल, अशी सूचना अभिनेत्री अमृता राव यांनी केली.
ठाणे महापालिकेच्या सहकार्याने अभियान राबविण्याचा विचार असून, आमदार निरंजन डावखरे यांच्या सहकार्याने तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल. त्यानंतर महापालिका आयुक्तांना योजनेचा सविस्तर आराखडा देण्यात येईल, अशी माहिती अमृता राव यांनी दिली.
ठाण्याच्या विकासात `एमसीएचआय'चे
मोठे योगदान : प्रताप सरनाईक
ठाणे, दि. १९ (प्रतिनिधी) : ठाणे शहराच्या विकासात `क्रेडाई-एमसीएचआय'चे योगदान महत्त्वाचे आहे, असे कौतुक राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज येथे केले. शहरात लवकरच सुरू होणाऱ्या मेट्रो, अंतर्गत मेट्रो आणि पाँड टॅक्सीमुळे नागरिकांचा प्रवास वेगाने होईल, असे प्रताप सरनाईक यांनी नमूद केले.
`क्रेडाई-एमसीएचआय'तर्फे बाळकूम येथील `दोस्ती वेस्ट काऊंटी' येथे २३ व्या भव्य प्रॉपर्टी प्रदर्शनाचा शेवटच्या दिवशी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह आमदार संजय केळकर यांनी प्रदर्शनाला भेट दिली. तसेच उत्कृष्ट प्रदर्शनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. या वेळी अध्यक्ष सचिन मिराणी, सचिव फैय्याज विराणी, प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर, भावेश गांधी, महेश बोरकर, अमित दातार, इम्तेहान खान यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
१९९७ मध्ये पहिल्यांदा कॅडबरी कंपनीमध्ये चेतन पारीख व मुकेश सावला यांच्या नेतृत्वाखाली प्रॉपर्टी प्रदर्शनाला सुरुवात झाली. गेल्या २३ वर्षांत प्रदर्शनाने नावलौकिक मिळविला. उत्तम व्यवस्थापन व विश्वासार्हतेमुळे प्रदर्शनाच्या लोकप्रियतेत वाढ झाली. सध्याचे अध्यक्ष सचिन मिराणी, सचिव फैय्याज विराणी, प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर यांनी प्रदर्शनाला नवी उंची मिळवून दिली, याबद्दल मंत्री सरनाईक यांनी कौतुक केले.
मुंबईपेक्षा सर्वाधिक वेगाने ठाणे शहराचा विकास होत आहे. नवे प्रकल्प साकारले जात आहेत. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी व विकसक यांच्यासह नागरिकांनी शहराच्या समतोल विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले.
`क्रेडाई-एमसीएचआय'च्या प्रॉपर्टी प्रदर्शनात
२३४ घरांची नोंदणी, ३९८ कोटी कर्ज मंजूर
तीन दिवसांत २० हजार ४६७ नागरिकांची भेट
ठाणे, दि. १९ (प्रतिनिधी) : `क्रेडाई-एमसीएचआय'तर्फे बाळकूम येथील दोस्ती वेस्ट काऊंटीमध्ये सुरू असलेल्या २३ व्या भव्य प्रॉपर्टी प्रदर्शनाचा आज समारोप झाला. गेल्या तीन दिवसांत प्रदर्शनाला ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्हा व मुंबई उपनगरातील २० हजार ४६७ नागरिकांनी भेट दिली असून, २३४ नागरिकांनी आपल्या स्वप्नातील घराची नोंदणी केली. या प्रदर्शनात ३९८ कोटी रुपयांचे कर्जप्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. या प्रतिसादाबद्दल अध्यक्ष सचिन मिराणी, सचिव फैय्याज विराणी आणि प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर यांनी ग्राहकांचे आभार मानले आहेत.
या प्रदर्शनात ठाण्यातील ४० हून अधिक आघाडीच्या विकसकांचे १०० हून अधिक रेरा-मान्यताप्राप्त गृह प्रकल्प सादर करण्यात आले होते. त्यात ५५ लाख रुपयांच्या १ बीएचकेपासून प्रीमियम दर्जाच्या ४ बीएचके प्रशस्त निवासस्थानांचा समावेश होता. या प्रदर्शनात घोडबंदर रोड, कोलशेत, पोखरण आणि माजिवडा येथील मालमत्तांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. जुन्या ठाणे शहरातील पुनर्विकासाच्या मालमत्तेतही ग्राहकांनी औत्सूक्य दाखविले. किमान ५५ लाख ते २ कोटी २५ लाखांपर्यंतच्या घरांना सर्वाधिक मागणी आढळली. काही वैशिष्ट्यपूर्ण ऑफर्समुळे अनेक ग्राहकांनी घरांची थेट नोंदणी केली. या प्रदर्शनात स्टेट बँक, यूनियन बँकेसह काही बँका व वित्तसंस्थांची दालने होती. त्यात अनेक ग्राहकांच्या कर्जपुरवठ्यावरील अर्जावर तातडीने प्रक्रिया सुरू करण्यात आली.
घरखरेदीचे स्वप्न साकार करण्यासाठी पहिल्यांदाच प्रदर्शनात आलेल्या अनेक कुटुंबांचे घर खरेदीचे स्वप्न साकार झाले. त्यासाठी प्रदर्शनातील विधी व वास्तूविषयक मार्गदर्शन करणाऱ्या दालनांचीही ग्राहकांना मदत झाली. तर शेकडो कुटुंबांनी प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी जाऊन सुविधांची माहिती घेतली. या कुटुंबाकडून लवकरच घरखरेदी होण्याची अपेक्षा आहे. ठाणे शहरातील नियोजित ठाणे-बोरिवली बोगदा, मेट्रो, कोस्टल रोड आणि बुलेट ट्रेनच्या स्थानकाच्या पार्श्वभूमीवर या प्रदर्शनाला अनिवासी भारतीय व गुंतवणूकदारांकडूनही लक्षणीय प्रतिसाद मिळाला.
मुंबई महानगर क्षेत्रात सर्वाधिक निवासी घरे व व्यावसायिक मालमत्तांची विक्री ठाणे शहरात होते. ठाणे शहरात पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या असून, त्याचा नागरिकांना लाभ होत आहे. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या ठाणे शहरात उत्तम जीवनशैली आहे. त्यामुळे ठाणे हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक आदर्श शहर म्हणून उदयाला आले आहे, असा विश्वास व्यक्त करीत अध्यक्ष सचिन मिराणी यांनी प्रॉपर्टी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांचे आभार मानले. महारेरा मान्यताप्राप्त प्रकल्प व प्रॉपर्टी प्रदर्शनातील विश्वासार्ह विकसकांमुळे घरखरेदीला प्रतिसाद मिळाला, अशी माहिती अध्यक्ष सचिन मिराणी यांनी दिली.
प्रॉपर्टी प्रदर्शनात समावेश असलेले पारदर्शक गृहप्रकल्प, विविध सोयिस्कर पर्याय आणि कर्जपुरवठ्याच्या सुविधेमुळे ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, अशी प्रतिक्रिया सचिव फैय्याज विराणी यांनी दिली. या प्रदर्शनाच्या यशाबद्दल ग्राहकांबरोबरच विकसक आणि बँकेचे प्रतिनिधींचे आभारी असून, यापुढील काळातही `क्रेडाई-एमसीएचआय'च्या माध्यमातून ग्राहकांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी कार्यरत राहू, असे ते म्हणाले.
ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्हा आणि मुंबई उपनगरातील नागरिकांनीही प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल आम्ही ग्राहकांचे ऋणी आहोत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून घरखरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांना नोंदणी, सवलती आणि घराचा अंतिम ताबा मिळेपर्यंत सहकार्य करण्यात येईल, असे प्रॉपर्टी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर यांनी सांगितले.
या प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह ठाणे शहरातील लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. तसेच प्रदर्शनाची पाहणी करून शुभेच्छा दिल्या. त्याबरोबरच ठाणे शहराच्या विकासात `क्रेडाई-एमसीएचआय'ने बजाविलेल्या योगदानाबद्दल कौतुक केले. या प्रदर्शनात महारेरा, पाणीबचत या विषयावरील परिसंवादही पार पडले. त्यालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
To Know About Thane Real Estate Development Contact Us at (+91) 9833458323

